‘माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा, मी जनतेसमोर स्वत:ला फाशी देईन,’ गौतम गंभीरचे ‘आप’ला आव्हान

Advertisements
Advertisements
Spread the love

पूर्व दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या लोकसभा उमेदवार आतिशी मार्लेनायांच्याविषयी गौतम गंभीर यांनी कथित आक्षेपार्ह पत्रक काढल्याच्या प्रकरणाने आता आता अधिक ‘गंभीर’ वळण घेतलं आहे. ‘माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा, मी जनतेसमोर स्वत:ला फाशी देईन,’ असं आव्हान भाजप उमेदवार गौतम गंभीर यांनी आम आदमी पार्टीला दिलं आहे.  गौतम गंभीर यांनी ट्विटर वर आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत लिहीलंय की ‘ही पत्रकं वाटण्यामागे माझा काही हात आहे हे सिद्ध करा, मी जनतेसमोर फाशी घेईन. पण हे सिद्ध करू शकला नाहीत तर अरविंद केजरीवाल यांना राजकारण सोडावं लागेल. तयार आहात का?’
आतिशी यांची महिला आयोगाकडे तक्रार
दरम्यान, आतिशी मार्लेना यांनी या प्रकरणी दिल्ली महिली आयोगाकडे तक्रार केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीरवर मानहानीचा दावा ठोकण्याची भाषा केली आहे. गंभीर यांना हरभजन सिंह आणि व्ही व्ही एस लक्ष्मण या क्रिकेटपटूंचं समर्थन मिळालं आहे.
यापूर्वी अशी दोन आव्हानं गंभीर यांनी दिली आहेत. आधी त्यांनी म्हटलं होतं की या वादग्रस्त पत्रकासंदर्भात आपल्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले तर राजीनामा देणार, दुसरं आव्हान होतं की आरोप सिद्ध झाल्यास ते (गंभीर) उमेदवारी मागे घेणार. आता तिसऱ्या आव्हानात त्यांनी थेट स्वत:ला संपवण्याचीच भाषा केली आहे.

Advertisements

आपलं सरकार