तृणमूलचे उमेदवार ‘कोल माफिया’असल्याचे सिद्ध करा अन्यथा १०० उठाबशा काढा : ममता मोदींवर कडाडल्या

Advertisements
Advertisements
Spread the love

काल मोदींचा खोटारडेपणा पाहून त्यांच्या कानशिलात लोकशाहीची थप्पड मारावीशी  वाटते असे संतापजनक उद्गार काढल्यानंतर आज पुन्हा  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. मोदी यांनी तृणमूलचे उमेदवार कोल माफिया असल्याचा आरोप केला आणि ममता भडकल्या.

Advertisements

त्या म्हणाल्या ‘मी मोदींना आव्हान देते की माझे उमेदवार कोल माफिया आहेत हे सिद्ध करा, मी माझे सर्व उमेदवार मागे घेईन. पण तुम्ही खोटं बोलत असल्याचं सिद्ध झालं तर मात्र तुम्हाला कान धरून १०० उठाबशा काढाव्या लागतील,’असे थेट आव्हानच ममता दीदींनी मोदींना दिलं आणि पुन्हा एक चपराक लगावली.

Advertisements
Advertisements

ममता म्हणाल्या, ‘कोळसा खाणी केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. भाजप नेते कोळशाच्या व्यवहारांचे दलाल आहेत. माझ्याकडे एक पेनड्राइव्ह आहे. तो मी जनतेसमोर आणला तर कोल माफियांची कागदपत्रे आणि गाय तस्करीची एकेक प्रकरणे बाहेर येतील.’

यापूर्वी पुरुलिया सभेत मोदींनी ममतावर टीका केली. ममता यांनी मोदींना लोकशाहीवरील चपराक म्हटले. यावर उत्तर देताना मोदींनी दीदींची चपराक हा माझ्यासाठी आशीर्वाद असल्याचं म्हटलं.

भाजपला यंदाच्या निवडणुकीत बंगाल आणि ओडिशाकडून अधिक अपेक्षा आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे दोन टप्पे शिल्लक आहेत.

आपलं सरकार