धक्कादायक : आई सोबत लग्नाला आलेल्या दिड वर्षाच्या चिमुरडीवर मामानेच केला बलात्कार !!

Advertisements
Advertisements
Spread the love

लग्नात एका दीड वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्र्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर तिच्याच मामाने बलात्कार केला असल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत झुडपांमध्ये आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लग्न मंडपापासून ४०० मीटर अंतरावर पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली होती.

Advertisements

पीडित मुलगी आपल्या आईसोबत लग्नात आली होती. यावेळी आरोपीने मुलीला एका निर्जनस्थळी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी फिरोजाबाद जिल्ह्याचा रहिवासी आहे. आरोपीसोबत गेलेली आपली मुलगी दोन तासांनंतरही परत न आल्याने महिलेने शोध सुरु केला होता. शोध घेतल्यानंतर अनेक तासांनी पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावदेखील होत होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचू नये यासाठी कुटुंबीय वारंवार प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे.

Advertisements
Advertisements

महिलेला आपल्या मुलीसोबत तात्काळ लग्नमंडपातून निघून जाण्यास सांगण्यात आलं. एका स्थानिकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ‘आम्ही कलम ३७६ आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पीडित मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे’, अशी माहिती पोलीस अधिकारी प्रशांत त्यागी यांनी दिली आहे.

आपलं सरकार