It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

दारुड्या नवरदेवाला ” तिने ” बोहल्यावरून हाकलले आणि जो लग्नाला तयार झाला त्याच्या गळ्यात घातली वरमाला ….

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

गाजियाबादमधील लोनी येथे एका तरुणीने उंबरठ्यावर आलेली वरात पुन्हा परत पाठवत धाडसी निर्णय घेतला. झालं असं की, नवरदेव लग्नाचा पोहोचला तेव्हा पुर्णपणे दारुच्या नशेत होता. आपण ज्याच्यासोबत संपुर्ण आयुष्य घालवणार आहोत तो दारुच्या नशेत असलेला पाहून तरुणीने लग्न करण्यास थेट नकार दिला आणि वरात पुन्हा पाठवून दिली. ठरलेलं लग्न रद्द झाल्याने लग्नमंडपात काही काळासाठी थोडा तणाव निर्माण झाला होता. पण लग्नात आलेल्या एका तरुणाने तरुणीशी लग्न करण्याची तयारी दर्शवली सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. तरुण मुलीच्या नात्यातील आहे. तरुणीने पदवी शिक्षण घेतलं आहे.

हे प्रकरण ट्रॉनिका सिटी येथील कॉलनीतील आहे. बुधवारी येथील एका घरात लग्न होतं. दिल्लीच्या रोहिणी परिसरातून वरात येणार होता. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. नवरीमुलीच्या कुटुंबीयांनी अगदी थाटामाटात नवरदेव आणि वरातीचं स्वागत केलं. पण नवरदेव स्टेजवर पोहोचताच चित्र बदललं. नवरेदव पुर्णपणे दारुच्या नशेत होता. त्याला स्टेजवर उभं राहण्यासही जमत नव्हतं.

Advertisements


Advertisements

नवरदेवाला अशा परिस्थितीत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी नवरीमुलीने आपण लग्न करणार नसल्याचा निर्णय जाहीर केला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महत्त्वाचं म्हणजे, मुलीच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आणि वरात परत पाठवून दिली. पण यामुळे मुलीचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. यावेळी लग्नात आलेल्या एका तरुणाने आपण लग्न करण्यास तयार असल्याचं मुलीच्या वडिलांना सांगितलं. यावेळी चर्चा करुन सर्वांनी होकार दिला. नातेवाईकांचीही सहमती मिळाल्यानंतर लग्न पार पडलं.