News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

आणि इतर बातम्या…

१. लंडनः पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज कोर्टाने पुन्हा फेटाळला . लंडन पुढील सुनावणी २८ दिवसानंतर.

Advertisements

२. दुष्काळ निवारण तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश, औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप क्रमांक जारी

Advertisements
Advertisements

३. साताराः अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाची गुंगीचे औषध पाजून आईनेच केली हत्या, वाई येथील घटना

४. पुणेः कामावरून काढून टाकल्यामुळे फेसबुकवर बनावट अकाउंट काढून अश्लील वीडियो व मोबाइल क्रमांक टाकून बदनामी करणाऱ्याला सायबर सेलकडून अटक

५. शीना बोरा हत्याकांड: आरोपी पीटर मुखर्जीचा जामीन हायकोर्टाने नाकारला; सुनावणी १२ जूनपर्यंत तहकूब

६. धुळे : प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के. तडवी यांच्याविरोधात ३० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल.

७. ओडिसा : आंध्र प्रदेशच्या सीमेवर तीन महिलांसह पाच नक्षलवाद्यांचा चकमकीवेळी खात्मा

आपलं सरकार