It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Loksabha 2019 : बोलता बोलता भाजपचे सुपरस्टार प्रचारक नरेंद्रभाई मोदींचा बसला घसा

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठी देश पिंजून काढणा-या नरेंद्र मोदींना कोणीही भाषणबाजी पासून रोखू शकत नाही परंतु त्यांच्या घशाने मात्र त्यांना आवरले आहे. म्हणजे त्यांचा घसा बसला आहे.

दर दिवशी त्यांच्या दोन ते पाच जाहीर सभा होत आहेत. आज गुरुवारी मोदींच्या पाच जाहीर सभा होत्या. परिणामी त्यांच्या घशावर परिणाम झाला. सायंकाळी प्रयागराज येथील रॅलीत ते पोहोचले तेव्हा त्यांचा घसा पूर्ण बसला होता. तरीही त्यांनी जनतेला निराश केले नाही आणि २० मिनिटे भाषण केले. एरव्ही ते किमान ४० मिनिटे भाषण करतात.

Advertisements


Advertisements

सध्या मोदी दिवसाला दोन राज्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत. सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठी गुरुवारी त्यांनी उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये पाच जाहीर सभा घेतल्या. सायंकाळी जौनपूर येथील रॅली आटोपून ते प्रयागराज येथे पोहोचले.

पंतप्रधानांच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर नंतर ते २०० हून अधिक कार्यक्रमांत सहभागी झाले आहे. यात बहुतांश निवडणूक कार्यक्रम होते. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी १०० हून अधिक लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या होत्या. या काळात त्यांनी १०० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटनही केले. तरीही मोदी थांबणार नाहीत एवढं मात्र नक्की.