Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

” अंजुम” ने दिला प्रियकराच्या प्रेमाला खतरनाक “अंजाम” ….कसा तो पहा ….!!

Spread the love

नगरमधील प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये तरुणावर अॅसिडसारख्या ज्वालागृही रसायन फेकल्याप्रकरणातील गुन्हा दोन दिवसांत तोफखाना पोलिसांनी उघडकीस आला आहे. प्रियकर अमिर शेख हा आपल्याबरोबर इतर मुलींशी मैत्री करून फसवणूक करतो, या रागातून प्रेयसी अंजूम शेख हिने प्रियकरावर अॅसिड हल्ला केला आहे. याप्रकरणी प्रेयसी अंजूम शेख हिला पोलिसांनी अटक केली आहे. क्राइम पेट्रोल मालिका पाहून अॅसिड हल्ला करण्याच्या सूचल्याची कबुली प्रेयसीने दिली आहे.

प्रेयसीने फसविल्यानंतर किंवा एकतर्फी प्रेमातून मुलीवर अॅसिड हल्ल्याचा घटना घडतात. या गुन्ह्यात मात्र प्रेयसीने प्रियकरावर अॅसिड हल्ला केला आहे. सोमवारी प्रेमदान चौकातील तोरणा हॉटेलमध्ये प्रेयसीची वाट पाहत असलेल्या अमिर रशिद शेख (वय २५, रा. केरूळ आष्टी, जि. बीड) याच्या तोंडावर अॅसिडसारख्य़ा ज्वालागृही रसायन फेकले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. अमिरची प्रेयसी अंजूम शेख (रा. नारायणडोळ, नगर) हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी करून तिला सोडून देण्यात आले होते. परंतु हॉटेल सीसीटीव्ही कॅमेऱा फुटेज व इतर माहितीवरून अंजूम शेख हिने हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलिस हेडकॉन्स्टेबल नंदकुमार सांगळे, दत्तात्रय जपे, मंगेश खरमाळे यांचे पथकाने तपास सुरू केला. अंजूम शेख हिला नारायणडोह येथून पुन्हा तपासासाठी ताब्यात घेतल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला आहे. आरोपी हिने गुन्ह्यात वापरण्यासाठी अॅसिड कोठून आणले. तिला आणखी कोण साथीदार होते का याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.
अंजूम शेख व अमिर शेख या दोघांचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबध होते. अमिर हा इतर मुलींशी मैत्री करून आपली फसवणूक करतो, असे अंजूम शेखच्या निदर्शनात आले होते. त्यातून तिच्या मनात राग होता. या रागातून तिने अमिर यास धडा शिकविण्यासाठी गेल्या वर्षाच्या डिसेंबरपासून तयारी सुरू केली होती. सोनी वाहिनीवरील क्राइम पेट्रोल मालिका पाहून तिला अॅसिड हल्ला करण्याचे सूचले. त्यानुसार तिने अमिरला तोरणा हॉटेलमध्ये बोलवून त्याच्यावर अॅसिड हल्ला केला, अशी कबुली अंजूम शेख हिने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!