असाही बाप …दहावीच्या परीक्षेत परीक्षेत ‘ए प्लस’ न मिळाल्याने मुलाच्या पायावर मारली कुदळ !!

Advertisements
Advertisements
Spread the love

केरळमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेत ‘ए प्लस’ न मिळाल्याने एका वडिलांनी मुलाला कुदळीने मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलाचा पाय तूटला आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनीअटक केली आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील किलिमनूर येथे मंगळवारी  परिक्षेत सर्व विषयात  ‘ए प्लस’ न मिळवल्याने वडिलांनी मुलाला मारहाण केली. कुदळीने केलेल्या मारहाणीत मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याचा पाय तूटला आहे. केरळमध्ये सोमवारी   SSLC बोर्डाचे म्हणजेच दहावीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये सर्व विषयात ‘ए-प्लस’ न मिळवल्याने वडील संतापले आणि त्यांनी मुलाला मारहाण केली.

Advertisements
Advertisements
साबू ,४३ असे कुदळीने मारहाण करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. किलिमनूर गावात साबू पत्नी व मुलांसोबत राहतो. साबू व त्याची पत्नी शेतमजूर आहेत. पण हे कष्ट मुलाच्या नशिबात नये म्हणून साबुने त्याला चांगल्या शाळेत टाकले होते. मुलाने खूप शिकून मोठं व्हावं अशी त्याची इच्छा होती. पण मुलगा दरवर्षी जेमतेमचं गुण मिळवत होता. तसेच नेहमी कमी गुण मिळवून पास होत होता. त्यामुळे यावेळी साबुने त्याला चांगले गुण मिळवण्याची ताकीद दिली होती. मात्र मुलाला परिक्षेत ए प्लस मिळाला नाही. त्यामुळे त्याने रागाच्या भरात कुदळीने मुलाला मारहाण केली. यामध्ये मुलाचा पाय तूटला.

साबुच्या पत्नीने याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी साबू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेनंतर साबू फरार झाला होता. पोलिसांनी फरार साबूला मंगळवारी अटक केली. साबुला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आपलं सरकार