मोदी-शहा यांच्या भाषणांबाबत कारवाईचे आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांबाबत निवडणूक आयोगाला कारवाईचे आदेश देण्याला सुप्रीम कोर्टाने आज  नकार दिला. काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी याबाबत सुप्रीम कोर्टाला प्रतिज्ञापत्राद्वारे विनंती केली होती.

काँग्रेस नेत्या देव यांनी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर करुन मोदी-शाहंविरोधातील तक्रारींवर कारवाईचे निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती. त्याचबरोबर आणखी एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करीत त्यांनी निवडणूक आयोगावर मोदी-शाह यांची बाजू घेत असल्याचा आरोप करीत भेदभाव करीत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने मोदी-शाह यांना कोणतेही कारण न देता गुप्तपणे क्लीनचीट देणारे अनेक आदेश दिले आहेत. यामुळे कायद्याचे वारंवार उल्लंघन झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी कोर्टाने निवडणूक आयोगाला योग्य कारवाईचे आदेश द्यावेत. मात्र, असे करण्यास कोर्टाने नकार दिला.

Leave a Reply