भोपाळच्या निवडणुकीत धर्मयुद्ध : दिग्विजय म्हणाले भगव्या झेंड्यावर कोणाचाही एकाधिकार नाही…

Advertisements
Advertisements
Spread the love

मध्य प्रदेशातील भोपाळच्या जागेसाठी काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यात थेट लढत होत आहे. दोघेही हिंदुत्वाचे कार्ड वापरत आपला जोरदार प्रचार करीत आहेत. या प्रचाराला एक प्रकारे हिंदुत्वाची लढाई आणि धर्मयुद्धाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. बुधवारी दिग्विजय सिंह यांच्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर भगवे झेंडे आणि साधू दिसून आले. दरम्यान, याबाबत माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना, भगव्या झेंड्यावर कोणाचाही एकाधिकार नाही, अशा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी भाजपाला टोला लगावला.

Advertisements

विविध पुजा प्रकार पार पडल्यानंतर भोपाळमध्ये बुधवारी दिग्विजय सिंह यांच्या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी कॉम्प्युटर बाबा यांच्या नेतृत्वाखील मोठ्या प्रमाणावर साधू या रॅलीत उपस्थित होते. यावेळी एक अनोखे दृश्य पहायला मिळाले ते म्हणजे काही साधूंच्या हातात काँग्रेसचे झेंडे होते तर काहींच्या हातात भगवे. या दृश्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी उत्तर दिले की, भगव्या झेंड्यावर कोणाचा एकाधिकार आहे का?

Advertisements
Advertisements

यावेळी या रॅलीत काही लोकांनी मोदींच्या नावाची घोषणाबाजीही केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काँग्रेसने याप्रकरणी संबंधीतांची पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, या रॅलीत सुरक्षेनिमित्त साध्या वेशातील पोलिसही सहभागी झाले होते. त्यांच्या खांद्यावर यावेळी भगवे दुपट्टे देण्यात आले होते. मात्र, यामुळे निराळाच वाद निर्माण झाला. आम्हाला वरिष्ठांकडून असे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे यातील काही पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

आपलं सरकार