Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग उद्या दोन तासांसाठी बंद , मुंबईहून पुण्याला येणारी वाहतूक मात्र खुली राहणार

Spread the love

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ९ मे रोजी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला असून महामार्ग वाहतूक पोलिसांकडून याची अंमलबजावणी केली जाईल.

‘ओव्हरहेड गॅट्री’ बसवण्यासाठी द्रुतगती मार्ग रोखण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ९ मे रोजी दुपारी २ ते ४ च्या दरम्यान बंद करण्यात येणार आहे. किलोमीटर ८५ ते किलोमीटर ५५ दरम्यान ‘ओव्हरहेड गॅट्री’ बसवले जाणार आहेत.

या बंदमुळे अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने किलोमीटर ८५ म्हणजे किवळे येथे दोन तासासाठी थांबवली जातील. तेव्हाच हलकी चारचाकी आणि इतर प्रवाशी वाहने किवळे येथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर बंद असेल तेव्हा मुंबईहून पुण्याला येणारी वाहतूक खुली राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या बंद दरम्यान गरज नसल्यास प्रवास करणे टाळलं तर गैरसोय होणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!