प्रियांका गांधी यांनीही दिले मोदींना ‘ओपन चॅलेंज’ …काय ते पहा …

Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठविलेली असताना प्रियांका गांधी यांनी मोदींना खुले आव्हान दिले आहे .  देताना त्यांनी म्हटले आहे कि , आता उर्वरित आणि अखेरच्या दोन टप्प्यात तरी नरेंद्रमोदी यांनी नोटबंदी, जीएसटी, महिलांची सुरक्षा आणि त्या मुद्द्यावर ज्यात देशातील तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी. दिल्लीची एक मुलगी तुम्हाला हे खुले आव्हान देत आहे.

दरम्यान नरेंद्र मोदी यांनी  राजीव गांधी यांच्या नावावर निवडणूक लढविण्याचे आव्हान काँग्रेसला  दिले होते त्याला प्रियांका गांधी यांनी हे आव्हान दिले आहे. प्रश्न उत्तराचा  हा सिलसिला चांगलाच रंगत असल्याचे चित्र दिसत आहे.

यावेळी प्रियांका यांनी मोदींवरती घणाघाती हल्लाही चढवला. सध्याची परिस्थिती प्रचंड वाईट आहे. केवळ बहाणे करून आपलं अपयश लपवलं जात आहे. समजा, एखाद्या विद्यार्थ्याला होमवर्क दिला तर तो म्हणेल की, नेहरुंनी माझं पुस्तकच लपवलं. त्यामुळे होमवर्क झाला नाही. इंदिरा गांधींनी माझ्या होमवर्कच्या कागदाची होडी बनवून पाण्यात बुडवली. त्यामुळे माझा होमवर्क झाला नाही, अशी काहीशी आजची परिस्थिती झाली आहे, असा टोलाही त्यांनी मोदींना हाणला.

माझा जन्म दिल्लीचा आहे. महरौलीपासून ते मजनू का टिलापर्यंतचा सर्व परिसर मला माहीत आहे. ते मात्र ७ रेसकोर्सच्या चार भिंतीतून कधी बाहेर पडलेलेच नाहीत. मी दिल्लीत ४७ वर्षांपासून राहते. दिल्लीची जनता माझ्या प्रत्येक दु:खात सहभागी झालेली आहे, असं सांगतानाच आता खूप झालंय. आता मोदींचा पराभव केलाच पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. प्रियांका यांच्या दिल्लीतील या रोडशोमध्ये त्यांची दोन मुलं रेहान आणि मिराया सुद्धा सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदींना समोरासमोर चर्चेला येण्याचं आव्हान दिलं होतं.