गांधी कुटुंबांनी आयएनएस विराटचा टॅक्सीसारखा वापर करून देशाचा अपमान केला : नरेंद्र मोदी

Advertisements
Advertisements
Spread the love

गांधी कुटुंबांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर सुट्टी घालविण्यासाठी केला, असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर एका रॅलीला संबोधित करताना मोदींनी हा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. देशातील युद्धनौकेचा वापर सुट्टी घालविण्यासाठी करण्यात येत असल्याचं तुम्ही कधी ऐकलं का? माझ्या प्रश्नाचं आश्चर्य वाटू देऊ नका. हे घडलंय आणि आपल्या देशातच घडलंय. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा ते आयएनएस विराटवर १० दिवस सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. गांधी कुटुंबांनी आयएनएस विराटचा टॅक्सीसारखा वापर करून देशाचा अपमान केला आहे, असा घणाघाती हल्ला मोदींनी चढवला.

Advertisements

राजीव गांधींबरोबर आयएनएस विराटवर सुट्टी घालविण्यासाठी इटलीवरून त्यांचे सासू-सासरेही आले होते. विदेशी लोकांना देशाच्या युद्धनौकेवर घेऊन जाणे हा देशाच्या सुरक्षेशी खेळ नव्हता का? केवळ राजीव गांधी यांच्या सासूरवाडीची मंडळी होती म्हणून त्यांना वेगळी वागणूक का देण्यात आली? या सर्व लोकांची ऊठबस करण्यासाठी आपल्या लष्कराला कामाला लावण्यात आले होते. लष्कराच्या हेलिकॉप्टरचाही सुट्टी घालवण्यासाठी वापर करण्यात आल्याचं मोदी यांनी सांगितलं.

Advertisements
Advertisements

जेव्हा एखादं कुटुंब देशापेक्षा मोठं होऊ लागतं, तेव्हा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. जेव्हा एखादं कुटुंब देशापेक्षा मोठं होतं, तेव्हा देशातील जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, असं सांगतानाच २०१४ पूर्वी देशात एकाचवेळी दोन मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्याची सरकारची हिंमत होत नव्हती. २००९ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या सरकारच्या काळात लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचे सामने एकत्र झाले नव्हते. पण आम्ही मात्र हे करून दाखवलं, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

आपलं सरकार