मोदी जेव्हा टीएमसी लुटारुंचा पक्ष असल्याचा आरोप करतात तेव्हा त्यांना थप्पड मारावीशी वाटते : ममता भडकल्या

Advertisements
Spread the love

निवडणूक येताच मोदी रामनामाचा जप करत असतात. जणू काय  राम मोदींचा आणि त्यांच्या पक्षाचा एजंट आहे .  आणि ते काय काय बोलतात ? खोटे बोलण्याला पण मार्यादा असतात , त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान मी आजवर पाहिला नाही. त्यांच्या कानशिलात लोकशाहीची थप्पड मारावीशी वाटते, असं धक्कादायक विधान ममता बॅनर्जी यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पुरुलिया येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी कमालीच्या भडकलेल्या दिसल्या. तृणमूल काँग्रेसवर खंडणीचे पैसे वापरल्याचा हीन आरोप मोदींनी केला आहे. त्यांच्या या आरोपाबद्दल त्यांना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. मोदी आणि अमित शाह हे दुर्योधन आणि दुःशासनासारखे आहेत. रावण आहेत असाही आरोप बॅनर्जी यांनी केला.

मोदींनी ५ वर्षात अच्छे दिन आणण्याच्या गोष्टी केल्या होत्या. परंतु, नंतर त्यांनी नोटाबंदी केली. ते संविधान सुद्धा बदलणार आहेत. भाजपच्या घोषणांवर माझा तिळमात्र विश्वास नाही. पैसा माझ्यासाठी सर्व काही नाही. मात्र मोदी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये येतात आणि टीएमसी लुटारुंचा पक्ष असल्याचा आरोप करतात तेव्हा त्यांच्या कानशिलात मारावीशी वाटते, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. आमचा पक्ष खंडणीच्या पक्षावर चालत नाही. आमचा पक्ष माझ्या विकल्या जाणाऱ्या चित्रांच्या, पुस्तकांच्या आणि इतर कामांच्या उत्पन्नावर चालतो. आम्ही खंडणीखोर नाही मात्र मोदी आमच्यावर असे खोटे आरोप लावत आहेत.

पुरुलियातील आदिवासी गावांबद्दल मोदींना माहिती काय माहिती आहे? आतापर्यंत या भागात ३०० आयटीआय महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. मी प्रचंड संघर्ष केला. पण स्वत:ला विकून किंवा स्वत:चं मार्केटिंग करून राजकारण केलं नाही. संघर्षमय जीवन जगत असल्यानेच मी मोदींना घाबरत नाही, असंही त्या म्हणाल्या.