Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu & Kashmir : 300 मतदान केंद्रांवर पडलं नाही एकही मत !!

Spread the love

सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत असताना या टप्प्यात जम्मू – काश्नीरमधील अनंतनाग आणि लडाख येथील मतदार संघांचंही समावेश होता. अनंतनाग या अतिशय संवेदशील लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीचा मोठा  परिणाम जाणवला. कारण, अनंतनागमध्ये केवळ २.३८ टक्के मतदान झालं. तर, पुलवामा येथील काही बुथवर शून्य टक्के मतदानाची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीचा परिणाम दिसून आला. एका मतदान केंद्राबाहेर ग्रेनेड हल्ला झाल्यामुळे या हल्ल्यानंतर त्या ठिकाणी एकही मतदाता फिरकला नाही. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार जम्मू – काश्मीरमधील ३०० मतदान केंद्रावर एकही मतदान झालं नाही . तर लडाख आणि अनंतनागमध्ये १२.४६ टक्के लोकांनी मतदान केलं.

अनंतनाग लोकसभा मतदार संघातूनच २०१४ मध्ये माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती विजयी झाल्या होत्या. पण, त्यांच्या राजीनाम्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणुका झालेल्या नाहीत. घाटीमध्ये असलेली अशांतता यासाठी कारणीभूत आहे. निवडणूक आयोगाची आकडेवारी पाहिल्यानंतर १९९६ नंतर सर्वात जास्त काळ रिक्त राहिलेली अनंतनाग ही जागा आहे. या जागेवरून  काँग्रेसचे नेते मोहम्मद शफी कुरेशी देखील खासदार म्हणून विजयी झाले होते . अनंतनाग पीडीपीचा गड मनाला जातो. २०१४ मध्ये झालेल्या अनंतनागमधील १६विधानसभा जागांपैकी ११ जागा पीडीपीनं जिंकल्या होत्या.

दरम्यान, बुरहान वाणीच्या गावात एकही मतदान झालं नाही. तर, पुलवामातील आत्मघातकी दहशतवादी आदिल दार याच्या गावात  केवळ १५ जणांनी मतदान केलं. शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यामध्ये केवळ २.८१ टक्के मतदान झाले. जम्मू – काश्नीरमधील मतदानाची २०१४च्या तुलनेत केल्यानंतर यंदा मतदान कमी झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं. अनंतनागमध्ये झालेलं मतदान हे आजवरचं सर्वात कमी मतदान आहे. तीन वर्षापूर्वी बुरहान वाणीचा खात्मा करण्यात आला असून लोकांनी यंदा मतदानापासून लांब राहणे पसंत केल्याचं दिसून आलं. तर, पुलवामामध्ये केवळ १५जणांनी मतदान केलं. मतदानादरम्यान ग्रेनेड हल्ला देखील करण्यात आला होता. पण, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं नाही.

संवेदनशील क्षेत्रांमध्ये अनंतनागचा समावेश आहे. येथे तिसऱ्या , चौथ्या आणि पाचव्या टप्प्यांमध्ये मतदान झालं. पण, दर वेळी मतदानाची टक्केवारी घसरलेली पाहायाला मिळत आहे. २३ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं यावेळी मतदानाची टक्केवारी १२.८६ टक्के नोंदवली गेली. २९ एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी अनंतनागमध्ये ८.७२ टक्के मतदान झालं. तर सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी २.३८ टक्के मतदान झालं. त्यामुळे मतदानाची आकडेवारी घसरताना दिसत आहे. मतदान प्रकियेवेळी दहशतवाद्यांनी हल्लाची धमकी दिली होती. त्यामुळे देखील मतदानावर परिणाम झाला असल्याची शक्यता आहे.

लडाखमध्ये ६३ टक्के मतदान झालं. पहिल्या टप्प्यामध्ये काश्मीरमध्ये मतदानाचा उत्साह पाहायाला मिळाला. पण, त्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये मात्र लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं. पहिल्या टप्प्यामध्ये दक्षिण काश्मीरमधील बारामुल्ला येथे ३५ टक्के, मध्य काश्मीरमधील श्रीनगर येथे १४ टक्के तर, अनंतनागमध्ये यापूर्वी १३.६३ टक्के आणि त्यानंतर कुलगाममध्ये १०.३ टक्के मतदान झाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!