It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

दुःखदायक : लग्नाच्या एक दिवस आधी नवरदेवाचा मृतदेह आढळल्याने गावात पसरली शोककळा !!

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या  विनोद कुंभरे, २६  या तरुणाचा लग्नाच्या आदल्या दिवशी गावालगत असलेल्या जंगलात मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे, त्याच्या मृतदेहाजवळ चाकू मिळाल्याने या तरुणांची हत्या झाली आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज लग्नाचा मंडप लागला होता, त्याचे रूपांतर अंत्यसंस्काराच्या  मंडपात झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. गोंदिया जिल्ह्यातील  तुमसर तालुक्यातील येरली  येथे हि घटना घडली आहे.

विनोद कुंभरे हा चंद्रपूर जिल्ह्यात एका खासगी कंपनीत कामावर आहे, उद्या त्याचे आणि त्याच्या लहान भावाचे लग्न असल्याने तो सुट्टय़ांवर गावी आला होता, काल विनोद सायंकाळी काही कामानिमित्त घराबाहेर गेला तो परातलाच नाही. आज सकाळी गावशेजारील जंगलात त्याचा मृतदेह आढळला, त्याच्या पोटावर चाकूचा वार होता आणि शरीराजवळ एक चाकू ठेवला होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र चाकूवर रक्ताचे डाग दिसत नसल्याने हत्येचे ठिकाण दुसरे असावे, असा अंदाज तुमसरचे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी वर्तवला आहे. विनोद यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असून तीन भाऊ  आणि बहीण असे कुटुंब आहे, मोलमजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या विनोदची लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या का करण्यात आली, हे रहस्य पोलिसांना शोधून काढायचे आहे, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून विनोदचा मृतदेह शवविच्छेदनसाठी नेण्यात आले आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे.

Advertisements


Advertisements