Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चाँद मुबारक : देशभरात अनेक ठिकाणी चंद्र दर्शन : आजपासून पवित्र ‘रमजान’चे उपवास सुरू

Spread the love

देशभरात अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे उद्या मंगळवारपासून ‘रमजान’ हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू होत आहे. आज चाँद दिसल्यामुळे मुस्लीम बांधवांच्या उपवासांना उद्यापासून सुरुवात होत आहे. ५ मे रोजी चंद्रदर्शन झालं नव्हतं. त्यामुळे लखनऊच्या मकरजी चांद कमिटीने ७ मेपासून रमजान सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव नवव्या महिन्यात २९-३० दिवसाचा रोजा ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फितर म्हणजे ईद साजरी केली जाते. ईदसुद्धा चंद्रदर्शनानेच साजरी केली जाते.

पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा. या पवित्र महिन्यात आपल्या समाजात सौहार्द, आनंद आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी हीच सदिच्छा,’ अशा शब्दांत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!