Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लग्नानंतर एक महिन्याने “तिला ” समजले कि तो पोलीस नाहीच ….!!

Spread the love

अंबरनाथ येथील  एका तरुणाने मुंबई पोलीस असल्याचे सांगत तरुणीची फसवणूक करून लग्न केले खरे पण लग्नानंतर एक महिन्याने तरुणीला हे सत्य जेंव्हा समजले  त्यानंतर तिने या तोतया पोलीस नवऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात जाऊन  रीतसर तक्रार दिली. आणि हा तोतया पोलीस शेवटी गजाआड गेला . तिला महिनाभराच्या सहवासात आपला पती आपली फसवणूक करतोय अशी शंका होती अखेर  पोलीस आयुक्तालयातून नवऱ्याबद्दल माहिती घेतल्यानंतर तिचा संशय खरा ठरला.

किरण शिंदे असे आरोपीचे नाव असून वास्तविक जीवनात तो वॉचमन म्हणून काम करतो. मात्र, किरणने आपण मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असल्याचे सांगून अंबरनाथमधील २१ वर्षीय तरुणीशी विवाह केला. तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलीस वर्दीतील फोटो, वर्दीवरील नेम प्लेट आणि ओळखपत्र दाखवल्याने किरणवर त्यांचा विश्वास बसला. १३ डिसेंबर २०१८ ला तरुणीचे लग्न किरण शिंदेशी झाले. मात्र, वारंवार खाकी वर्दीवर घरी येणे, कामाची एकच नियमित वेळ असणे, याबाबत विचारणा करताच उडवा उडवीची उत्तरे देणे, त्यामुळे किरणचे बिंग फुटले.

आपला नवरा पोलीस खात्यात नोकरीला नसल्याचा संशय करणच्या बायकोला आला. अवघ्या एका महिन्यात या घडामोडी घडल्याने तिने ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात जाऊन किरणची माहिती काढली. त्यावेळी, आपला नवरा पोलीस नसून वॉचमन असल्याचे समजताच तिला धक्काच बसला. त्यानंतर पीडित तरुणीने सापळा रचून पोलिसांच्या मतदाने किरणच्या नकली पोलिसाच बिंग उघडं पाडलं. तर, २१ वर्षीय मुलीला फसवणाऱ्या किरणला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!