लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, टीव्ही अभिनेत्याला अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

एका जोतिषी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कथित बलात्कार केल्याप्रकरणी एका टीव्ही अभिनेत्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. एका महिला ज्योतिषावर या टीव्ही कलाकाराने बलात्कार केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. या कलाकाराने बलात्काराचा व्हिडिओ तयार करून त्या द्वारे तो ब्लॅकमेल करत असल्याचाही महिलेचा आरोप आहे.

Advertisements

मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, ऑक्टोबर २०१६ मध्ये एका डेटिंग अॅपद्वारे या दोघांची भेट झाली होती. या नंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. पुढे एके दिवशी या कलाकाराने तिला आपल्या फ्लॅटवर बोलावले. बलात्कार करण्यापूर्वी कलाकाराने महिलेला लग्न करण्याचे वचन दिले.

Advertisements
Advertisements

या कलाकाराने आपल्याला नारळपाणी पाजले आणि त्या नंतर आपल्याला गुंगी आली असा आरोप महिलेने केला आहे. गुंगीनंतरच कलाकाराने आपल्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला असा महिलेचा आरोप आहे.

आरोपी कलाकार व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत पैसे उकळण्याचे काम करत असल्याचाही महिलेचा आरोप आहे. असे असतानाही आपण आरोपी कलाकाराला लग्नाची गळ घालत राहिलो, मात्र तो नकार देत पैशाचा मागणी करत राहिला. काही दिवसांपूर्वी आपण त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो आपल्याला धमकी देऊ लागला असेही महिलेचे म्हणणे आहे. तुला जे काही करायचे आहे ते कर असे तो आपल्याला म्हणाल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. या नंतर मात्र पीडित महिलेने कलाकाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

आपलं सरकार