It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Loksabha 2019 : यावेळी नमो-नमो वाल्यांची सुट्टी होणार असून जय भीम वाले येणार आहेत : मायावती यांना विश्वास

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान पदासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच मायावती यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र निवडणुकीनंतर निकालाचे चित्र पाहून आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते.

ज्या ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, तिथे मायावतींचे एक बॅनर लावण्यात आले होते. बॅनरवर मायावती यांच्या नावासमोर पंतप्रधान लिहिलेले होते. त्यावर मायावती म्हणाल्या की,  नमो-नमो वाल्यांची सुट्टी होणार असून जय भीम वाले येणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाची संधी मिळाल्यास आपण आंबेडकर नगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू शकतो, असं त्यांनी म्हटले आहे.

Advertisements


Advertisements

मायावती लोकसभा निवडणूक लढवत नसून पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्या आंबेडकर नगरमधील प्रचार सभेत बोलत होत्या.  लोकसभा निवडणुकीनंतर गरज भासल्यास आपण आंबेडकर नगरमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असं मायावती यांनी सांगितले. मात्र पंतप्रधानपदासाठी आपण इच्छूक असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. सर्वकाही ठीक झाले तरच मी इथून निवडणूक लढवणार आहे. कारण दिल्लीच्या राजकारणाचा मार्ग आंबेडकर नगरमधूनच जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

विविधा