मोबाईल बॅटरीशी खेळताना झालेल्या स्फोटात दोन मुले भाजली…

Spread the love

मोबाइलची बॅटरी मोबाइलच्या बाहेर काढून खेळत असताना बॅटरीचा स्फोट होऊन दोन बालके गंभीर जखमी झाली. वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील घोडके वस्तीवर सोमवारी सकाळी नऊ वाजता हा प्रकार घडला.

Advertisements

कृष्णा रामेश्वर जाधव (वय ८) आणि कार्तिक रामेश्वर जाधव (वय ५) अशी जखमी बालकांची नावे आहेत. या घटनेत दोन्ही बालकांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. या दोघांवर सुरुवातीला शिवूर येथील दवाखान्यात उपचार करून अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

आपलं सरकार