यंदा लोकसभेत काॅंग्रेलाच काय भाजपलाही बहुमत मिळणार नाही : कपील सिब्बल

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्या ५१ जागांसाठी मतदान होणार असताना काँग्रेचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याने काँग्रेससमोर पेच निर्माण केला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असं कपिल सिब्बल एका मुलाखतीत म्हणाले.

Advertisements

काँग्रेसला बहुमत मिळणार नाही. पण काँग्रेसप्रणित यूपीए सरकार केंद्रात येऊ शकते. काँग्रेसने निवडणुकीत २७२ जागा जिंकल्यास राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे दावेदार ठरतील. तसंच भाजपला निवडणुकीत १६० पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, असा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय.

Advertisements
Advertisements

लोकसभा निवडणुकीच्या निकालात यूपीए आघाडीवर असेल. सत्ता स्थापनेसाठी गरज पडल्यास उत्तर प्रदेशातील दोन्ही पक्षांचा समावेश केला जाईल. पण आघाडी सरकार सत्तेत आल्यास पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय आघाडीद्वारे घेण्यात येईल. २३ मे नंतरच यावर स्पष्टपणे बोलता येईल, असं कपिल सिब्बल म्हणाले.

आपलं सरकार