बीग बी अमिताभ म्हणतात तब्येत बिघडल्यामुळे घराबाहेर पडू शकत नाही, पण चिंतेचं काही कारण नाही

Advertisements
Advertisements
Spread the love

बॉलिवूडचे शहेनशाह बीग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडल्याची माहिती  खुद्द अमिताभ बच्चन यांनीच स्वतःच्या  ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. अमिताभ यांचे फॉलोअर्स भरपूर आहेत. या दिग्गज अभिनेत्याची एक झलक मिळण्यासाठी फॅन्स आतुरलेले असतात. अमिताभ बच्चनदेखील आपल्या चाहत्यांना कधीही निराश करीत नाहीत. दर रविवारी आपल्या जलसा निवासस्थानी चाहत्यांची भेट घेतात. गेली ३६ वर्ष हा उपक्रम नित्याने सुरू आहे. या उपक्रमाला ‘संडे दर्शन’ असे म्हटले जाते. मात्र, या रविवारी अमिताभ आपल्या चाहत्यांना भेटण्यास असमर्थ ठरले. याबाबत अमिताभ यांनी ट्विट केलं आहे. काही कारणास्तव आजच्या संडे दर्शनमध्ये सहभागी होऊ शकत नाही. तब्येत बिघडल्यामुळे घराबाहेर पडू शकत नाही. चिंतेचं काही कारण नाही, असं अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
सध्या अमिताभ बच्चन ब्रह्मास्त्र आणि तेरा यार हूं मै या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. ७६ वर्षीय अमिताभ अजूनही चित्रपटांमध्ये काम करताहेत. आपल्या प्रकृतीची ते नेहमी काळजी घेत असतात.

Advertisements

आपलं सरकार