News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

Advertisements
Spread the love

१. नागपूरः व्हॉट्सअॅपद्वारे देहव्यापार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा कोराडीत छापा, महिलेसह दोघांना अटक, दोन तरुणींची सुटका

२. नागपूरः बॉबी माकन हत्याकांडाचा पर्दाफाश, कुख्यात लिटिल सरदारसह चौघांना अटक

३. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, नाशिक जिल्ह्यातील हर्षल भामरे या उमेदवाराने राज्यातून व मागासवर्गीयातून प्रथम क्रमांक पटकाविला, महिलांमध्ये कोल्हापुरमधील पद्मश्री दाईंगडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला

४. यूपीएच्या कार्यकाळात राहुल गांधींच्या बिजनेस पार्टनरला संरक्षण विभागाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचा गंभीर आरोप

५. मुंबईः सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला, नक्षलवादी हल्ल्यावरून शरद पवारांचे मुख्यमंत्र्यावर पुन्हा टिकास्त्र

६. कोल्हापूर: पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून सराफ सिद्धार्थ संतोष परमार याचे अपहरण करून हल्ला केल्याप्रकरणी तिघा संशयितांना अटक

७. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी १० वर्षांपूर्वीच काँग्रेसचे प्रयत्न. पंतप्रधान मोदी आता श्रेय घेत आहेत, पी. चिदम्बरम यांची टीका

८. अकोला : वरुर जऊळका येथील निलेश दळणकार या तरुणाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या.

९. अकोला : मुलाची हत्या करणाऱ्या बापास जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा निकाल.

१०. कोवळी ज्वारी खाल्ली; १७ गायी,४ म्हशींचा मृत्यू