करणी सेनेची जावेद अख्तर यांना धमकी , ‘माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारू’

Advertisements
Advertisements
Spread the love

बुरख्यासोबतच घुंगटवरही बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांना महाराष्ट्र करणी सेनेने धमकी दिली आहे. तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू, अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी दिली आहे.करणी सेनेने यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘आपल्या मर्यादांना ओळखा. राजस्थान राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका. जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा करणी सेनेच्या विरोधाला सामोरं जावं,’ असं त्या व्हिडिओत म्हटलं आहे.

Advertisements

गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी गुरुवारी बुरखा बंदीवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून, केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या 6 मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देत अख्तर यांनी दोन्हींवर बंदी घालण्याचं मत व्यक्त केले होते.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार