Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बदलतेय फेसबुक , नवीन बदलात मिळणार नवीन फीचर्स , युजर्सच्या प्रायव्हसीवर अधिक फोकस

Spread the love

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. फेसबुकने या नव्या डिझाईनमध्ये लाँच केल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सिग्नेचर ब्लू बॅनर रिमूव्ह करण्यात आला  असून कंपनीच्या नव्या डिझाईनमध्ये मेसेजिंग अ‍ॅप, ऑनलाईन मार्केट प्लेस आणि व्हिडीओ ऑन डिमांड हे एका बाजूला देण्यात आले आहेत. नवं फीचर युजर्ससाठी प्रायवेट फीड उपलब्ध करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्याची माहिती  फेसबुकने दिली आहे.

फेसबुकच्या नव्या डिझाईनमध्ये युजर्सच्या प्रायव्हसीवर फोकस करण्यात आलं आहे. हे डिझाईन प्रायव्हेट आणि इनक्रिप्टेड म्हणजेच सुरक्षितेसाठी तयार करण्यात आलं आहे. यामुळे कम्युनिकेशन हे जास्त सुरक्षित होणार आहे. याशिवाय फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवरून अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी मदत करत आहे. अपडेटनंतर युजर्स कोणता ग्रुप जॉईन करतील तेव्हा त्यांना पर्सनलाइज्ड न्यूज फीड मिळणार आहे. हे फीड तुमच्या मित्रमैत्रिणींच्या जनरलाइज्ड फीडपेक्षा वेगळं असणार आहे. तसेच फेसबुक ब्राऊज केल्यास ग्रुप इंटरॅक्शनचा पर्याय मिळणार आहे.

फेसबुक मेसेंजर अ‍ॅप अधिक चांगलं करण्यासाठी काम करत आहे. तसेच फेसबुकवर आता अनेक युजर्स हे एक साथ व्हिडीओ पाहू शकणार आहेत. हे फीचर आधीच रोल आऊट करण्यात आले होते.  युजर्सना त्यांच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये ही काही बदल लवकरच दिसण्यास सुरुवात होईल असं फेसबुकने म्हटलं आहे. फेसबुकच्या अ‍ॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अनेक फीचर्ससह फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार असल्याची घोषणा फेसबुकने केली आहे. फेसबुक मेसेंजरमध्ये अपॉइंटमेंट हे नवं फीचरही लाँच होणार असून याच्या मदतीने हॉटेलचं बुकींग करता येणार आहे. फेसबुकचं मेसेंजर अ‍ॅप हे Windows आणि macOS या दोन्ही प्रणालीसाठी लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रुप मॅसेजिंग, व्हिडिओ चॅटिंग, GIF इमेजेस पाठविण्याची सुविधा युजर्सना मिळणार आहे. सध्या या अ‍ॅप चाचणी सुरू असून या वर्षाच्या शेवटी हे लाँच करण्यात येणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!