दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना रोड शो दरम्यान मारहाण !!

Advertisements
Advertisements
Spread the love

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एका रोड शो दरम्यान अचानक एका तरुणाने त्यांच्या वाहनावर चढून झापड मारली आहे.  नंतर आपच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाची  यथेच्छ धुलाई केली . याआधीही केजरीवालांसोबत असाच प्रकार घडला आहे.  अरविंद केजरीवाल शनिवारी सायंकाळी मोतीनगरच्या परिसरात प्रचारासाठी रोड शो करत होते. यावेळी त्यांच्या जीपवर चढून एकाने त्यांना एक झापड लगावली. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे नाव सुरेश असल्याचे सांगितले जात आहे. तो कैलास पार्कमध्ये राहणाराआहे. तर फेब्रुवारी २०१६ मध्ये लुधियानामध्ये केजरीवाल यांच्या कारवर काही लोकांनी लोखंडी रॉड आणि दांड्य़ांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये कारची काच फुटली होती.जानेवारी २०१६ मध्ये छत्रसाल स्टेडिअममध्ये महिलेने शाई फेकली होती. तसेच २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांच्या एका रिक्षाचालकाने कानाखाली मारली होती. तसेच अन्य एका ठिकाणी त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती.

Advertisements

 

आपलं सरकार