फनी चक्रीवादळाचा वेग ओसरला , ओडिशात ८ जणांचा मृत्यू, मोठा धोका टळला, वादळ बांग्लादेशकडे रवाना

Advertisements
Advertisements
Spread the love

ओडिशात फनी वादळामुळे ८ जणांचा मृत्यू झाला झाला असून  पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. ‘फनी’ वादळानंतर परस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मे ला ओडिशाला जाणार आहेत . दरम्यान वादळाने ७०-८० किमीच्या वेगाने कोलकाता गाठण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच चक्रीवादळाचा वेग बराच कमी झाला आहे.तरीही खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे .  हे वादळ दुपारपर्यंत बांग्लादेशच्या किनाऱ्यावर आदळणार आहे. शनिवारी सकाळी दिघाच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या फनी वादळाने पश्चिम बंगालमध्ये थैमान घातले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे खरगपूरपासून कोलकात्यापर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

Advertisements

फनी वादळाच्या धोक्यामुळे कोलकाता विमानतळ बंद करण्यात आले. तर २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे कोलकात्यात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, काही इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे, तर मिदीनापूर परिसरात विजेचे खांब उखडले आहेत. मुर्शीदाबादही झाडंही कोसळली आहेत. पण कोलकात्याला पोहोचण्याआधीच या वादळाचा वेग ओसरला असून मोठा धोका टळला आहे. आज दुपारपर्यंत हे वादळ बांग्लादेशमध्ये पोहोचेल. मुर्शिदाबाद, मिदीनापूर या शहरांमध्ये आधीच पावसाने हजेरी लावली आहे. प्रशासनानेही स्थानिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. फनी वादळाच्या प्रभावामुळे देशात अनेक ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी पावसाच्या सरींचे आगमन झाले. यामुळे कडक उन्हाळ्यात थोडासा दिलास नागरिकांना मिळाला आहे.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार