Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘तुम्ही कधी शेतकरी, कामगार किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिलंय का ? मोदीजी अनिल अंबानींचे चौकीदार : राहुल गांधी

Spread the love

अंबानींच्या घराजवळ चौकीदारांची रांग लागली असून नरेंद्र मोदी पहिले उभे आहेत असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र यांना लगावला आहे. जयपूरमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली. चौकीदाराने चोरी केली असून भारताच्या हवाई दलाकडून 30 हजार कोटींची चोरी केली आणि अनिल अंबानी यांना दिले असा आरोपही यावेळी त्यांनी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि योग्य भाव देणार असं आश्वासन दिलं होतं. तुमच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार असं आश्वासन मोदींनी दिलं होतं अशी आठवण करुन देत ही देखील चोरीच असल्याची टीका राहुल गांधींनी केली. मी खोटी आश्वासनं देणार नाही पण न्याय योजनेमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल  असेही तेम्हणाले.

चौकीदार मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना राहुल म्हणाले कि , ‘तुम्ही कधी एखादा शेतकरी, कामगार किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिलंय का ? अनिल अंबानींच्या घराजवळ किती चौकीदार आहेत ? तिथे चौकीदारांची रांग लागली असून मोदीजी त्या रांगेत सर्वात पहिले आहेत’, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

राहुल गांधी बोलत असताना चौकीदार चोर है अशी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर राहुल गांधी काय चोरी झाली माहिती आहे का ? अशी विचारणा करत सांगितलं की, ‘चौकीदाराने चोरी केली असून भारताच्या हवाई दलाकडून ३० हजार कोटींची चोरी केली आणि अनिल अंबानी यांना दिले. १५ लोकांचं पाच लाख ५५ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. भारतातील शेतकरी, दुकानदार, तरुण यांचं एक रुपयाचं कर्ज माफ केलं नाही पण १५ लोकांचं कर्ज माफ केलं’.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!