Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Gallup World Poll survey : २०१७ मध्ये देशात १००० दहशतवादी हल्ले, हत्या, बलात्कार आणि अपहरणात वाढ तरीही मोदींच्या काळात लोक सुरक्षित मानतात !!

Spread the love

Findings from a Gallup World Poll survey conducted in India in October-December 2018 underscore that perceptions of safety remain relatively high despite continuing safety concerns in the nation. According to the most recent government statistics, published in 2016, the crime rate increased slightly during the first few years of Modi’s tenure, with an increase of kidnappings and abduction despite a decline in murders. Additionally, there were nearly 1,000 terrorist attacks in the country in 2017, third most in the world behind Iraq and Afghanistan.

लोकसभा निवडणुकांतील मतदानाचा चौथा टप्पा संपला असून उर्वरित तीन टप्प्यांच्या प्रचाराचा जोर वाढलेला असताना आणि या निवडणुकीत देशाची सुरक्षा हा सर्वात मोठा मुद्दा बनवून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचे भांडवल भाजपा नेत्यांकडून प्रचारासाठी केले जात असतानाच  “गॅल्प  वर्ल्ड पोल” या जगप्रसिद्ध संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला असून  या सर्वेनुसार २०१७ मध्ये देशात १००० दहशतवादी हल्ले झाले आहेत. जगभरात इराक आणि अफगानिस्ताननंतर भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. तरीही सर्व्हेमध्ये मोदी सरकारच्या काळात १० पैकी ७ लोकांना सुरक्षित वाटते असा अजब दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, २०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या २०१६ च्या गुन्हेगारी आकडेवारीनुसार दिल्लीसह २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या १९ शहरांमध्ये हत्या, बलात्कार आणि अपहरण यांसारख्या घटनांत वाढ झाली आहे. तरीही , रात्रीचे बाहेर फिरताना १० पैकी ७ लोक स्वत:ला सुरक्षित समजतात असे या सर्वेक्षणात  म्हटले आहे.

“गॅल्प  वर्ल्ड पोल” सर्वेक्षणानुसार सुरक्षेसंदर्भात ग्रामीण आणि शहरी भारतीयांची मते वेगवेगळी आहेत. तर, प्रादेशिक विभागानुसारही यात भरपूर फरक आहे. पूर्व भारतातील ७८ तर दक्षिण भारतातील ७५ टक्के नागरिक रात्री बाहेर फिरताना स्वत:ला सुरक्षित समजतात. तर ६० टक्के उत्तर भारतीयांना सुरक्षित वाटते.

राष्ट्र सुरक्षा, महिला सुरक्षा आणि अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख मुद्दे आहेत. “गॅल्प  वर्ल्ड पोल” च्या सर्वेक्षणानुसार १० पैकी ७ भारतीयांना मोदी सरकारच्या कार्यकाळात मध्यरात्री फिरताना सुरक्षित वाटते. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर, असे मत असलेल्यांची संख्या १७ टक्क्यांनी वाढली आहे. “गॅल्प  वर्ल्ड पोल” जगभरातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सर्वेक्षण करते. २००५ पासूनच भुकबळी, रोजगार, लिडरशीप परफॉर्मेंस यांसारख्या अनेक मुद्द्यांवर या संस्थेने सर्वे केले आहेत. गॅलप ने भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत एक सर्व्हे केला. त्यामध्ये नागरिकांना व्यक्तिगत सुरक्षेपेक्षा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रणी घेत चिंता जोर दिला.

https://news.gallup.com/poll/249203/indians-feeling-safer-modi.aspx

आपलं सरकार

Click to listen highlighted text!