गॅस सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नीसह मुलीचा होरपळल्याने जागीच मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका घरात शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये घरातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ वक्त करण्यात येत आहे. कुरुंदा येथील सोनाजी आनंदराव दळवी यांच्या यांच्या घरातील सिलिंडरमधून अचानकपणे गळती होऊ लागली. त्यामुळे शेगडी आणि सिलिंडर वेगळे ठेवले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झालेला असल्यानं त्यात उजळ करण्याचा प्रयत्न केला असता, गळती झालेल्या सिलिंडरचा अचानकपणे स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या दुर्घटनेत पती सोनाजी आनंदराव दळवी (वय ५५), पत्नी सुरेखा सोनाजी दळवी (वय ५०), मूलगी पूजा सोनाजी दळवी (वय २३) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
सिलिंडरचा स्फोट झाल्यानं लागलेल्या आगीत संपूर्ण घराचा कोळसा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत घराला लागलेली आग विझवली. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. सकाळी सहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Advertisements

आपलं सरकार