आमचा विजय आणि मोदींचा पराभव निश्चित, मी मोदींची नव्हे , न्यायालयाची माफी मागितली : राहुल गांधी

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे चार टप्पे पार पडले आहेत. आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या आधारे आम्ही अंतर्गत सर्व्हेक्षण केले असून, त्यात आमचा विजय स्पष्टपणे दिसत आहे, असे नमूद करतानाच नरेंद्र मोदीनक्कीच पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. चार टप्प्यातील मतदान पाहिल्यास भाजपचा पराभव होणार आणि आमचा विजय होणार, हे निश्चित आहे. आमच्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे ती या दाव्याला पुष्टी देणारी आहे, असे राहुल म्हणाले.

Advertisements

शिवाय चौकीदार चोर है’ हा शब्दप्रयोग करताना मी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला दिला, ही माझी चूक होती आणि ती मी मान्य केली आहे. मी न्यायालयाची माफी मागितली असली तरी पंतप्रधान मोदींची माफी मागितलेली नाही. त्यांनी देशाचा पैसा अनिल अंबानीला दिला, या म्हणण्यावर मी आजही ठाम आहे, राफेल करारात घोटाळा झाल्याचे देशातील ६७ टक्के लोकांचे मत असून या प्रकरणामुळे ‘भ्रष्टाचारविरोधी नेता’ ही नरेंद्र मोदी यांची ओळख पुसली गेली आहे, असेही राहुल पुढे म्हणाले. ‘ असेही राहुल यांनी पुढे नमूद केले.

Advertisements
Advertisements

देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण आहे. बेरोजगारी, जीएसटी, नोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. शेतकऱ्यापुढे आत्महत्येशिवाय गत्यंतर उरलेले नाही. अशा स्थितीत सरकारविरोधात जो रोष आहे तो तुम्हाला निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळेल, असा अंदाज राहुल यांनी व्यक्त  केला.

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपा-बसपा आघाडी वेगवेगळे लढत असल्याने मतविभाजन होईल व त्याचा फायदा भाजपला होईल, असे वाटते का?, या प्रश्नावर ‘नाही’, असे उत्तर राहुल यांनी दिले. उत्तर प्रदेशात धर्मनिरपेक्ष पक्षांना यश मिळणार आहे. जिथे आमचे उमेदवार कमकुवत आहेत, तिथे आम्ही सपा-बसपाला मदत करणार आहोत. आमचं पहिलं लक्ष्य भाजपला पराभूत करणं, हेच आहे. प्रियांका आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनाही मी तेच सांगितले आहे, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार