CycloneFani Live : ओरिसाच्या काही जिल्ह्यात ‘फनी’ चक्रीवादळाची सुरुवात, वाऱ्याचा वेग वाढला ताशी २४५ किमी …. पहा व्हिडीओ ….

Advertisements
Advertisements
Spread the love

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले प्रचाराचे सर्व कार्यक्रम आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता आज आणि उद्या स्थगित केले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1124179276712910848

West Bengal CM Mamata Banerjee to stay in Kharagpur, near the coastal belt and monitor the situation herself, today and tomorrow. All her political campaigns for the two days have been cancelled. (file pic)

Advertisements

कोस्ट गार्डकडून ४ बोटी आणि चेतक विमान तैनात

नेव्हीचे १३ विमाने विशाखापट्टणम येथे तैनात करण्यात आले आहेत.

फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हे वादळ ओडिशाच्या दिशेनं सरकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ वेगानं पुढे सरकत आहे. आज दुपारपर्यंत हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता होती, मात्र हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सकाळी 8 ते 10 वाजेदरम्यानच फानी चक्रीवादळ पुरी शहरातील गोपाळपूरमध्ये पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.

पुरी किनारपट्टीला चक्रीवादळ धडकलं

वाऱ्याचा वेग ताशी १४५ किमी

 

आंध्राच्या श्रीकाकुलम इथं जोरदार पाऊस आणि वादळाला सुरुवात झाली आहे.

Advertisements
Advertisements

गेल्या 24 झालेल्या तासांत फनी वादळामुळे असुरक्षित जिल्ह्यांमधून 10 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. गंजम आणि पुरी येथील अनुक्रमे 3 लाख आणि 1.3 लाख लोक सुरक्षित स्तहली हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात अली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखांनी दिली आहे. विशेष म्हणजे 541 गर्भवती महिलांना रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची काळजी घेण्यात येत आहे . उद्या दि .4 मे रोजी संध्याकाळी हे सायकॉनिक वादळ म्हणून उत्तर-पश्चिमेच्या दिशेने बांगलादेशात जाण्याची शक्यता आहे.

बहुचर्चित विनाशकारी  ‘फॅनी’ चक्रीवादळ पुढच्या काही तासात ओदिशाच्या किनारपट्टीला धडकणार असले तरी या वादळाच्या हालचालीला प्रारंभ झाला आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या हे वादळ ओदिशाच्या गोपालपूरपासून ६५ किलोमीटर अंतरावर तर पुरीपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. ओदिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

‘फॅनी’ हे चक्रीवादळ शुक्रवारी रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असून त्याचे सावट संपूर्ण दक्षिण भारत आणि पूर्व किनाऱ्यावर आहे. हे चक्रीवादळ ओदिशामध्ये धडकणार असून पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांनाही त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याबाबत यापूर्वीच ‘हाय अलर्ट’ जारी केला असून या वादळाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे.

आपलं सरकार