It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Loksabha 2019 : वाराणसीमध्ये मोदींच्या विरोधात २५ उमेदवार , मुख्य लढत सपा-बसपा आणि काँग्रेसशी

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वाराणसी मतदार संघात पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या १०२ उमेदवारांपैकी आता २५ उमेदवार मैदानात आहेत.  दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी ७१ अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरवले. तर ५ जणांनी आपले  उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे  तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याने त्यांची मुख्य लढत काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि महाआघाडीचे उमेदवार शालिनी यादव यांच्यामध्येच होणार आहे.

वाराणसी लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यामध्ये १९ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, येथून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता.  अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांमध्ये श्याम नंदन (जनता पार्टी), अर्जुन राम शंकर (जनसंघर्ष विराट पार्टी) राजेंद्र गांधी (अपक्ष), राजकुमार सोनी (अपक्ष) आणि संजय विश्वकर्मा (कांशीराम बहुजन दल) यांचा समावेश आहे त्यामुळे आता  वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण २६ उमेदवार मैदानात उरले आहेत.

Advertisements


Advertisements

वाराणसी येथून निवडणूक लढवत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. तर सपा-बसपा आघाडीने काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे माजी उपसभापती श्यामलाल यादव यांची सून शालिनी यादव यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने बीएसएफमधील बरखास्त जवान तेज बहादूर यांना आपला उमेदवार बनवले होते. मात्र तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळल्याने शेवटी त्यांनाच मोदींच्या विरोधात लढावे लागणार आहे. दरम्यानच्या काळात प्रियांका गांधी यांनी मोदींच्या विरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु पक्षाने त्यांना उमेदवार न बनविण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रियांका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक न लढविण्याची अनेक कारणे  सांगण्यात येतात त्यापैकी मायावती त्यांना पाठिंबा देण्यास तयार नव्हत्या , प्रियांकावर उत्तर प्रदेशच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची जबाबदारी आहे , तर प्रारंभी असे सांगण्यात आले कि, तत्वाचा प्रश्न आहे. एखाद्या पक्षाच्या प्रमुख पक्षाच्या नेत्याच्या विरोधात निवडणूक न लढविणे काँग्रेसची परंपरा आहे. म्हणून सोनिया आणि राहुल यांनी मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी यांना उभे करणे संयुक्तिक वाटले नाही. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांनीही शड्डू ठोकले होते परंतु बुवा-बाबुवा वादात त्यांनीही मोदींच्या विरोधात उभे राहण्याचा नाद सोडून दिला.त्यामुळे मोदींच्या  विजायचा मार्ग खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांनीच एका अर्थाने मोकळा केला आहे.२०१४ च्या निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोदींना दिल्लीहून येऊन चांगली लढत दिली होती.