आम्ही या निवडणुकीकडे एक युद्ध म्हणून पहातो , भाजपाला फायदा करून देण्यापेक्षा मरण पत्करेन : प्रियंका गांधी

Spread the love

निवडणुकीत भाजपाला फायदा करून देण्यापेक्षा मी मरण पत्करेन असं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. रायबरेलीमध्ये प्रियंका गांधी यांना एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर प्रियंका गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार असे आहेत का ज्यामुळे भाजपाला फायदा होईल? असा प्रश्न विचारताच प्रियंका गांधी यांनी उत्तर दिलं आहे की आम्ही या निवडणुकीकडे एक युद्ध म्हणून पहातो आहोत. भाजपाला फायदा करून देण्यापेक्षा मी मरण पत्करेन असं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे.

Advertisements

आम्ही प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार दिला आहे. आमच्या उमेदवारामुळे भाजपाला फायदा होईल अशी परिस्थिती कुठेही नाही. आमच्यामुळे भाजपाला फायदा होईल असं वातावरण नाही. त्यांना फायदा करून देण्यापेक्षा मी मरण पत्करेन असं मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

काँग्रेस आपल्या बळावर ही निवडणूक लढवत आहे. आम्ही प्रत्येक जागी सक्षम आणि भाजपाला टक्कर देतील असेच उमेदवार दिले आहेत. अनेक मतदारसंघात काँटे की टक्कर असेल तसेच आमचे उमेदवार भाजपाचा पराभव तरी करतील किंवा त्यांची मतं तरी कमी करतील याची मला खात्री आहे असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

याचवेळी प्रियंका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मुलांनी जे अपशब्द वापरले त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबाबतही प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर प्रियंका गांधी म्हटल्या की मी त्या मुलांना अशा घोषणा देण्यापासून थांबवले. मात्र भाजपाच्या नेत्यांनी नेमका तेवढाच भाग वापरला ज्यात मुलं चुकीच्या घोषणा देत आहेत. देशाच्या पंतप्रधानांबाबत अशा घोषणा देणे चूक आहे हे मी त्या मुलांना सांगितले आणि त्यांना त्या घोषणा देण्यापासून रोखले. मात्र भाजपाने ते दाखवले नाही आणि माझ्यावरच आरोप केले जात आहेत असं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे.

आपलं सरकार