It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

पुलवामा येथील हल्ल्यात वापरण्यात आलेली कार ही गुजरातची, पूर्वनियोजित कटाचा भाग : शंकरसिंह वाघेला

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला हा भाजपाचा गोध्रा हत्याकांडासारखा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. पुलवामा येथील हल्ल्यात वापरण्यात आलेली कार ही गुजरातची होती. कारवरील नंबर प्लेटवर इंग्रजीत GJ असे लिहिले होते, असा दावाही त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे शंकरसिंह वाघेला यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर गंभीर आरोप केले.

पुलवामा येथील हल्ला हा भाजपाचा कट होता. गोध्रा येथील हत्याकांडही भाजपाचे षडयंत्र होते, असेही त्यांनी नमूद केले. शंकरसिंह वाघेला पुढे म्हणाले, बालाकोट येथील एअर स्ट्राइक हे षडयंत्रातील एक भाग होता. बालाकोट येथे एकही दहशतवादी मारला गेला नाही. एकाही आंतरराष्ट्रीय संस्थेला एअर स्ट्राइकमध्ये २०० दहशतवादी मारले गेल्याचे सिद्ध करता आले नाही. पुलवामा येथे गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भाजपाकडे बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांविषयी माहिती होती तर त्यांनी आधीच का कारवाई केली नाही, पुलवामासारख्या घटनेची ते वाट बघत होते का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. भाजपाचे विकासाचे गुजरात मॉडल खोटे आहे. गुजरातची अवस्था बिकट असून गुजरातमधील भाजपा नेतेच पक्षनेतृत्वावर नाराज आहे. गुजरातमधील भाजपा नेत्यांना ते मजूर असल्याचे वाटते, असा दावाही त्यांनी केला.

Advertisements


Advertisements