Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केरळमधील एका मुस्लिम सोसायटीच्या महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी

Spread the love

श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेल्यानंतर भारतात याच मुद्द्यावर चर्चा सुरू असताना केरळमधील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी घातली गेली आहे. विशेष म्हणजे केरळमधील मल्लपुरम येथे असलेल्या अल्पसंख्याक महाविद्यालयात ही बंदी घालण्यात आली आहे. हे महाविद्यालय मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमार्फत चालवले जाते.

श्रीलंकेत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने चेहरा झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या पेहरावांवर बंदी घातली. भारतात निवडणुकीच्या धामधुमीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातील संपादकीयातून बुरखा आणि नकाबबंदीची मागणी केली. मात्र, नंतर ही वर्तमानपत्राची व्यक्तिगत भूमिका असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले.

भोपाळमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शिवसेनेच्या या मागणीचे समर्थन केले असले तरी भाजपने मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे. अशा प्रकारच्या बंदीची आवश्यकता नसल्याचे भाजप प्रवक्ता नरसिंह राव यांनी पक्षाची भूमिका जाहीर करताना म्हटले आहे. एनडीएचे सहकारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या मागणीला विरोध केला आहे. बुरखा परिधान करणे हा परंपरेचा भाग असल्याचे आठवले म्हणाले होते.

बुरखाबंदीच्या मागणीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. आमच्या राज्यघटनेत हा मूलभूत हक्क आहे. तुमचे हिंदुत्व तुम्ही दुसऱ्यावर लादू शकत नाही. चेहऱ्यावर दाढी ठेवू नका, टोपीही घालू नका, असेही उद्या तुम्ही म्हणाल, अशा शब्दांत ओवेसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ओवेसी पुढे म्हणाले, ‘हे लोक (शिवसेना) वाचन करत नाही. सुप्रीम कोर्टाने ३७७ कलमाबाबत काय म्हटले हे शिवसेनेने वाचले पाहिजे. मी कॅपिटल लेटरमध्ये म्हणत आहे, ‘CHOICE’… चॉइस हा आमच्या राज्यघटनेत मूलभूत अधिकार आहे.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!