Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाबुभाई रायकेंना निवडणूक आयोगाकडून ७२ तासांसाठी प्रचारावर बंदी

Spread the love

निवडणूक आयोगाने गुजरातच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाबूभाई रायक यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ७२ तासांसाठी प्रचारावर बंदीची कारवाई केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून रायक यांच्या प्रचारावर प्रतिबंध लागू होणार आहे. एका सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी खालच्या पातळीवर भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

११ एप्रिल रोजी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना संबोधित करताना, बाबुभाई रायका यांनी असभ्य आणि अपमानजनक भाषा वापरली होती. त्यांच्या विधानाचा निवडणूक आयोगाकडून  निषेध करण्यात आला असून, भारतात कुठेच रायका यांना ७२ तासासाठी प्रचार सभा घेता येणार नसल्याचा, आदेश  निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. गुजरात प्रदेशाध्यक्ष बाबुभाई रायका यांना ५ मे रोजीपर्यंत प्रचार बंदी लागू रहाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!