Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

फनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, तीन लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

Spread the love

वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. हे वादळ ओडिशात पुरीच्या किनारपट्टीवर उद्या थडकेल, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. ओडिशातील समुद्र किनाऱ्यालगत असलेली १० हजार गावं आणि ५२ शहरांना फनी चक्रीवादळाचा जबर तडाखा बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फनी वादळाचा धोका पाहता ओडिशाच्या किनाऱ्यावरून तब्बल ११.५ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात  येत आहे . यापैकी ३.३ लाख नागरिकांना आधीच सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत. भुवनेश्वर विमानतळावरील वाहतूक आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली आहेत. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर हवाई वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. रेल्वे सेवाही बंद करण्यात येत आहे.

ओडिशा सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती (NCMC) ला  व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली आहे. १० हजार गावं आणि नऊ जिल्ह्यातील ५२ शहरांना वादळाचा तडाखा बसू शकतो, असं ओडिशा सरकारनं कळवलं आहे. एनसीएमसीसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली. वादळाचा धोका असलेल्या भागांमध्ये नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत. यासोबतच मोबाइल एसएमएस आणि स्थानिक माध्यमांद्वारे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून ठिकठिकाणी केले जात आहे. तसंच एनडीआरएफ आणि ओडीआरएफची पथकं मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान या आपत्तीला तोंड देण्याची ओडिशा सरकारने पूर्ण तयारी केली असून  नागरिकांना ९०० शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे. ओडिशातील गंजम, गजपती, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर या जिल्ह्यांना वादळाचा सर्वाधिक धोका आहे. तर पश्चिम बंगालमधील पश्चिम आणि दक्षिण मिदनापूर, उत्तर २४ परगना, हावडा, हुगली, झारग्राम आणि कोलकाता बाहेरील भागाला वादळाचा धोका बसण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम, विजयनगर आणि विशाखापट्टणम या शहरांना वादळाचा धोका आहे. ओडिसात प्रशासनाने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!