Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सेना-मनसे राड्यात पोलीस मारहाण प्रकरणी खा. राहुल शेवाळे यांच्या पत्नीसह १७ जणांना शिक्षा

Spread the love

शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना मुंबई सत्र न्यायालयाने एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मागील 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात एका पोलीस हवालदाराला बेदम मारहाण झाली होती. याप्रकरणी मंगळवारी शेवाळेंची पत्नी कामिनी यांच्यासह अन्य 17 जणांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. न्यायालयाने तूर्तास त्यांना जामीनही मंजूर केला आहे.

साल 2014 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुर्भे येथे पैसे वाटपाच्या आरोपावरुन बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले होते. त्यावेळी त्याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी विकास थोरबोले यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी थोरबोले यांच्यावरच काही जणांनी हल्ला चढवला. जमावाकडून झालेल्या मारहाणीत हवालदार थोरबोले गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात कामिनी यांच्यासह अन्य 17 जणांवर आयपीसी कलम 149 आणि 427 यानुसार मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि जमावबंदीचा आरोप दाखल केला होता.

मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश डी के गुदाधे यांनी मंगळवारी हत्येचा प्रयत्न या आरोपातून सर्व आरोपींची सुटका केली. या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी न्यायालयाने तूर्तास सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!