उद्या तुम्ही आमच्या दाढीला आणि टोपीलाही आक्षेप घ्याल : असदुद्दीन ओवेसी यांचा बुरखा बंदीच्या वक्तव्याला विरोध

Advertisements
Advertisements
Spread the love

शिवसेनेच्या बुरखाबंदीच्या मागणीला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. ‘निवडीचा अधिकार’ हा राज्यघटनेनं दिलेला मूलभूत अधिकार आहे. तुम्ही हिंदुत्व सर्वांवर थोपवू शकत नाही. उद्या तुम्ही आमच्या दाढीला आणि टोपीलाही आक्षेप घ्याल,’ असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेत बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर बुरखाबंदी करण्यात आली आहे. बुरख्याच्या आडून दहशतवादी फिरू शकतात, हे गृहित धरून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा आधार घेत शिवसेनेनं ‘सामना’ या मुखपत्रातून बुरखाबंदीची मागणी केली आहे. यानंतर शिवसेनेवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठते आहे. एमआयएम नेते असदुद्दिन ओवेसीयांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Advertisements

‘कोणी काय कपडे घालावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयानं तसा निकाल दिला आहे. वैयक्तिक गोपनीयता हा देशातील नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळं बुरखा घालण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही. बुरखाबंदी करणं घटनाविरोधी आहे. हिंदुत्ववादी शक्तींना राज्यघटना नको आहे. शिवसेना त्यातीलच एक पोपट आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांनी कधी बुरखा घातला होता का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

Advertisements
Advertisements

‘शिवसेनेनं ही मागणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली आहे. देशात मोदीविरोधी वातावरण आहे. ते बदलण्यासाठी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आचारसंहितेचं उल्लंघन असून निवडणूक आयोगानं शिवसेनेवर कारवाई करावी, अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे. तर, बुरखाबंदीचे समर्थन करणार नसल्याचं स्पष्टीकरण भाजपने दिलं आहे.

दरम्यान अग्रलेखातून करण्यात आलेली बुरखाबंदीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे. नीलम गोऱ्हे यांनी ही भूमिका मांडताच संजय राऊत यांनी ट्विट करून अग्रलेखाचं समर्थन केलं आहे. ‘शिवसेनेच्या भूमिकेमुळं ओवेसींनी इतके लाल-हिरवे होण्याची गरज नाही, असं सुनावतानाच, राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांनाही नाव न घेता खोचक टोला हाणला आहे. ‘बुरखा बंदीच्या शिवसेनेच्या भूमिकेत नवीन काहीच नाही. खुद्द शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हीच भूमिका ठामपणे मांडली आहे. महिला नेत्यांनी मुस्लिम महिलांचे दु:ख समजून घ्यावं,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार