Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

घरगुती वादातून दाम्पत्याची चिखलदरा येथे दरीत उडी मारुन आत्महत्या

Spread the love

चिखलदरा येथील भीमकुंड येथे दोन हजार फूट खोल दरीत उडी मारुन एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे आठ वाजता वाजता घडली. या दाम्पत्याला एक वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र, तो घरी असल्यामुळे बचावला. घरगुती वादातून पत्नी तीन आठवड्यांपासून माहेरी गेली, पतीने तिला समजावून दुचाकीवर आणले आणि दोघांनी भीमकुंड पॉईंट वरून दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

विषयीची अधिक माहिती अशी कि , गणेश हेकडे (वय २५) यांचे दोन वर्षांपूर्वी राधा यांच्याशी लग्न झाले होते. हेकडे दाम्पत्याला एक वर्षाचा बजरंग नामक मुलगा आहे. गणेश हा कुस्तीपटू असल्याची माहिती असून अमरावती जिल्ह्यात त्याचा प्रथम क्रमांक आला होता. तो हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा विद्यार्थी होता. घरगुती वादातून तीन आठवड्यांपूर्वी रागाच्या भरात राधा माहेरी (मोथा गाव) निघून गेली. गणेशने काही दिवसांपूर्वीच मुलाला घरी आणले होते, सततच्या वादातून कंटाळल्यामुळे त्याने बुधवारी सकाळी मोथा येथे सासरी जाऊन राधाला दुचाकीवरून आणले, यादरम्यान दोघेही आत्महत्या करणार असल्याचं त्यांनी राधाच्या काकांना सांगितल्यामुळे काका सुदेश महादेव निखाडे लागलीच त्यांच्या मागावर गेले. त्यानंतर काकांना दोघेही शहापूर येथे गेले नसल्याचं कळल्यामुळे चिखलदरा पोलिसांत त्यांनी तक्रार दिली.  पोलिसांनीही तत्काळ भीमकुंड पॉइंट वर जाऊन पाहणी केली असता दोघांनी उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चिखलदाराचे ठाणेदार आकाश शिंदेसह सहकारी दरीतून मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!