Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bad News : निवडणुकीच्या धामधुमीत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ !!

Spread the love

लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागलीय. सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढवल्यात. तशात एलपीजी सिलेंडर 6 रुपयांनी वाढलंय. सबसिडी नसलेल्या सिलेंडरची किंमत 22.5 रुपयांनी वाढलीय. ही किंमत आजपासून ( 1 मे ) लागू झालीय. या वाढीनंतर आता दिल्लीत  सिलेंडरची किंमत 502 रुपये झालीय. सबसिडी नसलेल्या सिलेंडरसाठी 730 रुपयाहून जास्त पैसे मोजावे लागतील. तर मुंबईत सबसिडी असलेल्या गॅस सिलेंडरची किंमत 493.86 रुपये झालीय. बिना सबसिडी सिलेंडर आता 6 रुपयांनी महाग झालंय.

1 एप्रिलपासूनही गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या होत्या. एप्रिलमध्ये म्हणजे गेल्या महिन्यात बिना सबसिडी सिलेंडरची किंमत 5 रुपयांनी वाढवली होती. ती आता 6 रुपयांनी वाढली आहे. तर सबसिडी मिळत असलेल्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 28 पैशांनी आणि मुंबईत 29 पैशांनी वाढलीय.

सबसिडी मिळत असलेल्या कुटुंबाला वर्षाला 12 सिलेंडर्स मिळतात. सबसिडीचे पैसे थेट बँक खात्यात जातात.

याआधी जून 2018 नंतर सिलेंडरच्या दरात 6 वेळा वाढ झाली होती. त्यानंतर एकूण 6 वेळा कपातही झाली होती. त्यामुळे 14.13 रुपयांची कपात झाली होती. 1 नोव्हेंबर 2018 रोजी सिलेंडरच्या दरात पुन्हा 2.94 रुपयांची वाढ झाली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!