Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पश्चिम बंगालआघाडीवर ७६.४४ टक्के मतदान , महाराष्ट्रात सर्वाधिक ७२ टक्के मतदान नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात

Spread the love

 महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. राज्यात चार टप्प्यांमध्ये एकूण ६०.६८ टक्के मतदान झाले आहे. तर आज पार पडलेल्या निवडणुकीच्या चौथ्या आणि महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलीय. महाराष्ट्रात सर्वाधिक ७२ टक्के मतदान नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात झाले. तर कल्याणमध्ये सर्वांत कमी ४४ टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रात ग्रामीण भागात चांगले मतदान झाले. तर शहरी भागांमध्ये मतदानाची टक्केवारी काहीशी घसरली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचे प्रमाण यंदा सारखेच राहिले आहे. राज्यात एकूण ८ कोटी ८५ लाख मतदार होते. त्यापैकी ५ कोटी ३७ लाख मतदारांनी मतदान केले, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी दिली. आचारसंहिता काळात सोने आणि रोकड असा १५७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निवडणूक काळा १७ हजार ५०० गुन्हा दाखल झाले आहेत.

पश्चिम बंगालआघाडीवर ७६.४४ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज ९ राज्यांमध्ये ७२ मतदारसंघांसाठी मतदान झालं. चौथ्या टप्प्यात देशभरात एकूण ६४ टक्के मतदान झालं. यात पश्चिम बंगालमध्ये बंपर म्हणजे ७६.४४ टक्के मतदान झालं. तर महाराष्ट्रात सर्वांत कमी म्हणजे ५७ टक्के इतकं मतदान झालं. मध्य प्रदेश ६६.१४ टक्के, बिहार ५८.९२ टक्के, जम्मू-काश्मीर ९.७९ टक्के, ओडिशा ६८ टक्के, राजस्थान ६४.५० टक्के, यूपी ५७.५८ टक्के तर झारखंडमध्ये ६३.७७ टक्के इतके मतदान झाले.

सिनेकलावंत आणि उद्योजकांचा सहभाग

आजच्या मतदान प्रक्रियेत हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलावंत , रंगकर्मी , आणि अनेक उद्योगपतींनी सह कुटुंब मतदानाचा आनंद घेतला . यामध्ये प्रामुख्याने  उद्योगपती मुकेश अंबांनी यांनी कुटुंबासोबत मतदान केले. तर बॉलिवडूमध्ये अमिताभ बच्चन यांनीही कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच शाहरूख खान, गौरी खीन, सलमान खान, प्रियांका चोपडा, आमीर खान, आमीरच पत्नी किरण राव, करिना कपूर अभिनेत्री कंगणा राणावत आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कुटुंबासोबत मतदान केले. तसंच माधुरी दीक्षित, दिया मिर्झा, वरुण धवन, डेव्हिड धवन, सनी देओल, बॉबी देओल आण फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने मतदान केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!