Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांच्या आत्महत्येप्रकरणी संजीव उन्हाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Spread the love

औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार सुंदर उर्फ दिलीप लटपटे यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, त्यांच्या भगिनी आणि मयत लटपटे यांच्या पत्नी वृंदा उन्हाळे यांच्या विरुद्ध पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि 306, 34   नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अधिक तपास चालू असून संजीव उन्हाळे यांना अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मयत पत्रकार सुंदर लटपटे यांचा संजीव उन्हाळे यांच्या भगिनीबरोबर आंतरजातीय विवाह झाला होता, लग्न झाल्यापासून उन्हाळे यांनी लटपटे यांना मानसिक त्रास दिला होता.  इतकेच काय तर घटनेपूर्वी सहा महिने अगोदर लटपटे पती -पत्नीत फूट पाडून दोघांना विभक्त केले तसेच उन्हाळे यांनी पोलिसांकडे खोट्या तक्रारी केल्या, त्यामुळेच सुंदर लटपटे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.  ही फिर्याद मयत सुंदर लटपटे यांचे चुलत भाऊ भाऊसाहेब लटपटे यांनी दिली आहे.
लोकपत्र, पुण्यनगरी, पुढारी आदी वृत्तपत्रात संपादक, कार्यकारी संपादक आदी पदावर काम केलेल्या सुंदर लटपटे (वय ५६)  यांनी, १४ एप्रिल रोजी  पहाटेच्या सुमारास  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली होती. त्यात त्यांचा मेहुणा ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, त्यांच्या भगिनी आणि मयत लटपटे यांच्या पत्नी वृंदा उन्हाळे- लटपटे यांची नावे होती.

१४ एप्रिल रोजी ही आत्महत्या घडल्यानंतर सुंदर लटपटे यांच्या सुसाईड नोट मध्ये संजीव उन्हाळे यांचे नाव होते परंतु त्यानुसार थेट उन्हाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करता  पोलिसांनी या संदर्भात कायदेविषयक सल्ला घेऊन अखेर लटपटे यांच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. अजुनही तपास चालू असल्याचे पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे यांनी सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!