Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जेट एअरवेजच्या आजारी कर्मचाऱ्याची आर्थिक तंगीमुळे आत्महत्या

Spread the love

जेट एअरवेजच्या एका सीनियर टेक्निशियनने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्करोगाच्या आजारामुळे आर्थिक तंगी जाणवत असल्याने हा कर्मचारी तणावात होता. आर्थिक तंगीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा जेटच्या कर्मचाऱ्यांनी केला. तर आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
शैलेंद्र सिंह असं या ४५ वर्षीय कर्मचाऱ्याचं नाव आहे. नालासोपारा पूर्व येथे हा प्रकार घडला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार शैलेंद्र यांना कर्करोग झाला होता. त्यांची केमोथेरपी सुरू होती. त्यामुळे तणावात असलेल्या शैलेंद्र यांनी आज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तर जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचं हे पहिलं प्रकरण असल्याचं जेटच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

शैलेंद्र आणि त्यांचा मुलगा दोघेही जेटमध्ये कामाला होते. त्यांचा मुलगा जेटमध्ये ऑपरेशन्स डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. मात्र कंपनी बंद पडल्याने दोघेही बेरोजगार झाले होते. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामाना करावा लागत होता. त्यातूनच शैलेश यांनी आत्महत्या केल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. शैलेश सिंह यांच्यामागे पत्नी, दोन मुलं आणि दोन मुली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.  जेटच्या सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासूनचं वेतन देण्यात आलेलं नाही. पैसाच नसल्याने जेटने त्यांच्या विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याने या हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!