Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गोमुत्र पिल्यामुळे कर्क रोग बरा होतो किंवा गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्याने रक्तदाब कमी होतो , हे साध्वी प्रज्ञाचे म्हणणे साफ खोटे

Spread the love

गोमुत्र पिल्यामुळेच माझा कर्करोग बरा झाला असून गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास बीपी (रक्तदाब) कमी होतो, यांसह अनेक दावे प्रज्ञा ठाकूर यांनी केले असले तरी त्यांची हि विधाने लोकांना आणि रुग्णांना चुकीचा संदेश देणारी आहेत. टाटा मेमोरियल सेंटरचे उप-संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी साध्वीचे हे वक्तव्य खोटे  असून कर्करोगाशी संबंधित रुग्णांची दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय जगतात याबाबत कुठलाही पुरावा अस्तित्वात नसल्याचे डॉ. राजेंद्र बडवे आणि त्यांच्या टीमने स्पष्ट केलं आहे.  त्यांच्यासह  रिसर्च सेंटरमधील अनेक कर्करोगावरील तज्ञ डॉक्टरांनीही प्रज्ञा ठाकूर यांचा दावा खोटा ठरवला आहे.

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक नवा शोध लावला. प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या या विधानामुळे त्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. गोमुत्रामुळे माणसाचा कॅन्सर बरा होतो असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी, माझा कर्करोग गोमुत्र पिल्यानेच बरा झाल्याचा दावा त्यांनी केला होता. गाईच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमुत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. पंचगव्य म्हणजे शेण , दही, गोमूत्र अशा गोष्टींपासून बनवलेलं औषध शारिरीक आजारांना बरं करतं. तसेच, गाईच्या चेहऱ्यावरुन हात फिरवल्यानंतर गाईला आणि माणसाला दोघांनाही सुख मिळतं असंही त्यांनी सांगितल होतं. तसेच माझा कॅन्सरही त्यामुळेच बरा झाल्याचं साध्वी म्हणाल्या होत्या. मात्र, डॉक्टरांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

मुंबईतील ऑन्कोलॉजिस्टांनी भाजपा उमेदवाराचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे हे स्तनाच्या कर्करोगावर उपचार करणारे देशातील नामवंत सर्जन आहेत. डॉ. बडवे यांनी हा दावा फेटाळत, तसा कुठलाही पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. कुठलाही वैद्यकी अहवाल या दाव्याचे समर्थन करत नाही. केवळ, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी या वैद्यकीय उपचाराद्वारेच स्तनाचा कर्करोग बरा होतो, असे बडवे यांनी स्पष्ट केलंय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!