Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

Spread the love

1. राजुराः पीडितांबाबत वादग्रस्त वक्तव्य; सुभाष धोटेंवर अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

2. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात भक्कम सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा

3. विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक, देशासाठी मतदान करा – मुख्यमंत्री

4. बदलापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा रद्द; प्रशासनाने हेलिकॉप्टर उतरण्यास परवानगी नाकारली

5. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पनवेलमध्ये 9 लाखाची रोकड जप्त

6. मुंबईः मालेगाव बाँम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहला उमेदवारी का दिली? गुप्तचर यंत्रणांकडे माहिती असताना जवानांना त्या रस्त्यावरून का पाठवलं ?  राज ठाकरे यांचा सवाल,  सरकारकडून जाहिरातींवर ४५०० कोटींचा खर्चः राज ठाकरे

7. औरंगाबाद: दात्याअभावी मूत्रपिंड प्रत्यारोपण रखडलेल्या ५८ वर्षीय रुग्णावर भिन्न रक्तगट असलेल्या पत्नीच्या मूत्रपिंड दानाने नवजीवन

8. मुंबईः जेट एअरवेज मधील अभियंते आता आंदोलनाच्या पवित्र्यात; आजवर अभियंते आंदोलनात नव्हते, पण ते लवकरच आंदोलन करणार.

9. मुंबईः पुलवामानंतर भारत के वीर पोर्टलवर २२५ कोटींचा मदतनिधी गोळा; पुलवामापर्यंत हा आकडा ४५ कोटी होता

10. मुंबईः विजय मल्यापाठोपाठ पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचीही मुंबई हायकोर्टात याचिका; ‘फरार  आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्याच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची विनंती याचिकेद्वारे केली, ५ जूनला होणार सुनावणी

11. आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत विजय मल्ल्या यांच्यावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; ही कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंडाची शिक्षाः वकील अमित देसाई यांचा दावा

12. मद्रासः मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने टिकटॉक अॅपवरील बंदी हटवली
13. पंतप्रधान मोदींवर कोणी बोट उचललं, तर मी त्याचा हात कापून टाकेन; हिमाचल प्रदेशचे भाजपाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांचं वादग्रस्त विधान
14. औरंगाबाद : नरेगाव येथील नगरसेवक गोकुळ मलके यांना शिवीगळ केल्याप्रकरणी एपीआय शेख अकमल यांच्यावर करवाईची मागणी करीत नागरिकांचे सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन, विभागीय चौकशीचे पोलिस उपायुक्ताचे आदेश.

15. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू  असली तरीहि ११० टक्के अफवा असल्याचे ट्विट

16. शुक्रवारी राज्यातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, परभणी आणि बीड आदी भागात उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याचा इशारा

17. वाघाला दगड मारणं पडलं महागात, पर्यटकाला 51 हजारांचा दंड

आपलं सरकार

Click to listen highlighted text!