Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Update Top Ten : एक नजर : दुपारपर्यंतच्या ताज्या बातम्या ….

Spread the love

१. प्रियांका गांधी मोदींविरुद्ध लढणार नाहीत; वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय यांना उमेदवारी

२. बिहार: हा नव्या दमाचा भारत आहे त्यामुळे तो दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारणार, भारत माता की जय आणि वंदे मातरम् या घोषणा म्हणजेच आमच्यासाठी शक्ती आहेत : दरभंगा येथील रॅलीला संबोधित करताना नरेंद्र मोदी

३. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजस्थान दौऱ्यावर, कोटा आणि जालौर येथे सभांना संबोधित करणार

४. नाशिक : मनमाड येथे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा; ओवैसी अनुपस्थित

५. जालना : कुमार जुंझुर या युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या; किल्ला जिनिंग परिसरात आढळला मृतदेह.

६. औरंगाबादमध्ये नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

७. माजी राज्यमंत्री आणि जम्मू काश्मीर पीपल कॉन्फरन्सचे नेते इमरान रजा अंसारी यांच्या श्रीनगर मधील करन नगर येथील घरावर आयकर विभागाचे छापे

८. मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते पटकथा लेखक सलीम खान यांना ७७ वा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान

९. ममता बॅनर्जी यांच्या चरित्रपटावर निवडणूक आयोगाने घातली बंदी

१० . श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट ?, पुगोडा शहर स्फोटांच्या आवाजाने हादरले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!