Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मतदानासाठी उघड्या जीपमधून जाणा-या मोदींकडून आचारसंहितेचा भंग : असीम सरोदे

Spread the love

मतदानासाठी जाताना मोदींनी ओपन जीपमधून जाऊन आचारसंहितेचा भंग केला असून मोदी कायदे मोडण्यात चतुरच नाही तर शातीर असल्याची टिका सुप्रसिद्ध मानवी हक्क व कायदेतज्ज्ञ असीम सरोदे व्यक्त केली आहे. तसेच मोदी आणि अमित शाह हे व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधलेले स्वयंसेवक असल्याचे सरोदे म्हणाले आहेत. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील राणिप येथील मतदान केंद्रात मतदान केले. त्याआधी त्यांनी गंधीनगर येथील आपल्या आईच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मतदानाला जाताना मोदींनी ओपन जीपमधून जात छोटा रोड शो केला. यावरच सरोदे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टिका केली आहे.

‘मतदान व मोदी-शाह’ या मथळ्याखाली सरोदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. मोदी हे कायदा मोडण्यात चतुर नाही तर शातीर असल्याची टिका सरोदे यांनी केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘पंतप्रधान खुल्या जीपमधून रोड शो करत मतदानाला गेले आणि तो रोड शो नव्हता असं ते आता म्हणतील कारण हा माणूस नुसता ‘चतुर’ नाही तर ‘शातीर’ आहे कायदे मोडण्यात.’ तसेच मोदींच्या गाडीचा वेग १० ते १५ किलोमीटर प्रती तास इतका मंद होता. आपण साधारणत: इतक्या कमी वेगाने जातो का असा सवाल सरोदे यांनी उपस्थित केला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156995909045185&id=585360184

मोदींनी केलेले हे शक्तीप्रदर्शन म्हणजे रोड शो होता आणि मोदींनी असं करुन आचारसंहितेचा भंग केला आहे असं सरोदे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘नागरिकांनी समजून घ्यावे की मोदींचा तो रोड शोच होता आणि ते तसे करणे निवडणूक आचारसंहितेचा भंग करणे आहे. एखादी गोष्ट गुन्हा आहे की नाही हे ठरविण्यासाठी त्यामागचा ‘उद्देश’ बघणे महत्वाचे असते. साधारणतः जर ते खुल्या (ओपन) जीप मधून जात नाहीत आणि केवळ मतदान करण्यासाठी खुल्या जीपमधून जातात व शाहजोगपणाने सांगतात की मी रॅली काढली नाही तर ते खोटे बोलत आहेत. मोदी यांनी निवडणुक आचार संहितेचा भंग केला आहे,’ असं सरोदेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!